Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player


 

Photo Gallary
Imporatant links
Feedback
NIRF

भविष्यकालीन वाटचाल (ROAD MAP)
१. मुलभूत सोई सुविधा-
खालील तक्त्यामध्ये मागील १२ वर्षामधील महाविद्यालयातील प्रवेशित विद्यार्थी संख्येमध्ये झालेली वाढ दर्शविलेली आहे.

वर्ष विदयार्थी संख्या
२०००-०१ ५५०
२००५-०६ ६५०
२०१०-११ ९००
२०१२-१३ ११५०
२०१५-१६ १४८०
२०१६-१७ १५३०


आज मितीला महाविद्यालयाकडे वापराकरिता असलेले चटई क्षेत्र खालील प्रमाणे आहे.

अ.नं. तपशील क्षेत्र चौ.मी.
१. प्राचार्य केबिन २४.७५ मी.
२. स्टाफरूम ४२.०० मी.
३. ऑफीस ९१.५२ मी.
४. वर्ग खोल्या (स्वतंत्र महा विद्यालय) १९९.८० मी.
५. वर्गखोल्या (सामाईक) २९२.८० मी.
६. प्रयोगशाळा ३९९.६२ मी.
७. लायब्ररी १२०.८२ मी.
८. जिमखाना ९२.९४ मी.
९. सेमिनार हॉल ५३.०० मी.
एकूण १३१७.२५ मी.


वाढत्या विद्यार्थी संख्येचा विचार करता आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील ५ वर्षाचा विचार करता महाविद्यालयाला आणखी ६००० चौ. फुट. इतके चटई क्षेत्र असलेली इमारत बांधणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा इमारत आणि गोगटे हॉल यांच्यामध्ये रिकाम्या जागेत दुमजली इमारत उभी करून ही गरज भागविण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर विद्यार्थीनीसाठी वसतिगृह आणि ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत बांधण्याची योजना आहे.

२) अभ्यासक्रम – वाढती विद्यार्थी संख्या आणि अभ्यासक्रमामध्ये विविधता आणण्यासाठी

अ) कला शाखेकडे भूगोल, समाजशास्त्र यासारखे विषय तसेच वाणिज्य शाखेकडे कॉस्टिंग सारखे विषय व विज्ञान शाखेकडे पदार्थविज्ञान, गणित व संख्याशास्त्र सारखे विषय पदवी पयंत सुरु करयाचे नियोजन आहे.

ब) सध्या अस्तित्वात असलेल्या ८ व्याव्सायभिमुख कोर्सेसमध्ये भर घालून आणखी ५ नवीन कोर्सेस सुरु करण्याला प्राधान्य दिले जाईल.


क) मूक्त विद्यापीठाचे कोर्सेस सुरु केले जातील.

३) शिक्षक सक्षमीकरण –
अ) महाविद्यालयामध्ये सध्या नियमित २६ प्राध्यापकांपैकी प्राचार्यासह नऊ प्राध्यापक Ph.D. पदवीधारक आहेत. ही टक्केवारी २० च्या आसपास आहे. ही बाब तातडीने लक्ष देण्यासारखी असल्यामुळे जास्तीत जास्त प्राध्यापकांना संशोधनासाठी प्रोत्साहित करून व त्यांना आवश्यक फेलोशिप, रजा व सोई पुरवून हे Ph.D. पद्विधारकांचे प्रमाण येत्या ५ वर्षात ७५% पेक्षा अधिक नेण्याचा प्रयत्न राहील.

ब) प्राध्यापक वर्गाचा संशोधन कार्यामध्ये सहभाग वाढावा म्हणून जास्तीत जास्त प्राध्यापक हे संशोधन प्रकल्पांचे चे काम हाती घेतील अशी परिस्थिती निर्माण करण्याला प्राध्यान दिले जाईल.

क) प्राध्यापकांचा समाजप्रबोधनात्मक उपक्रमामध्ये सहभाग वाढविणेसाठी प्रयत्न केला जाईल.

४) माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर - अद्ययन अद्यापन व मूल्यमापन प्रक्रियेत तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला जाईल.

५) विद्यार्थ्यांची गुणवत्ता – विधार्थ्यांना मुलभूत सोईसुविधा पुरवून त्यांच्यामध्ये जागतिक स्पर्धेलासामोरे जाण्याची क्षमता येण्याकरिता अभ्यासक्रमांची आणि अभ्यासक्रमपुरक उपक्रमांची आखणी करणे.

Future Plans