College anniversary function

Education is the most powerful weapon which you can use to change the world.

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात ऑनलाईन आवेदन सादर करण्याविषयी कार्यशाळा

मंगळवार दि २४/९/२०१९

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन आवेदन सादर करण्याविषयी कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील सरांनी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज स्वतः सादर कसा करावा याविषयी माहिती घ्यावी, तसेच सर्वानी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आव्हाहन उपस्थितांना केले. शिष्यवृत्ती समुपदेशन समिती व विद्यार्थी कल्याण समितीचे प्रमुख प्रा. एस. डी. गावडे सरांनी प्रास्ताविक करताना मागील शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती लाभधारक विद्यार्थ्यांना संपूर्ण शैक्षणिक शुल्क मिळाल्याचे सांगितले. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एन. के. पाटील सरांनी कार्यक्रमाचे संचालन करताना शिष्यवृत्तीसाठीचे ऑनलाईन आवेदन हे मोबाईल फोन किंवा कॉम्पुटरचा वापर करून कसे भरता येईल याविषयी माहिती दिली. ऑनलाईन आवेदन कसे सादर करावे , त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याचे मार्गदर्शन प्रात्यक्षिकासह प्रा. सचिन गावडे यांनी केले. यावेळी प्रा. व्ही. के. गावडे, प्रा. एस. एस. सावंत, प्रा. टी. एम. पाटील, श्री. पी. पी. धुरी उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी प्रा. व्ही. के. गावडे सरांनी आभार मानले.

Image removed.

मतदान जनजागृती फेरी

Shinde Saheb

आज दि. २५ जानेवारी २०१९ रोजी र. भा. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड व तहसील कार्यालय, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने चंदगड येथे मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. जनजागृती फेरीची सुरुवात महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर मान. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील, चंदगड तालुक्याचे तहसीलदार मान. शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देऊन झाली. यावेळी डॉ. पी. आर. पाटील सरानी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून दिले. जनजागृती फेरी महाविद्यालयातून सुरु होऊन संभाजी चौक ते तहसीलदार कार्यालय या मार्गाने संपन्न झाली.यावेळी रा. से. यो. प्रमुख एस एन पाटील, एस. के. सावंत, डॉ एन. के. पाटील, एस. डी. गावडे, व्ही. के. गावडे, एस. एस. सावंत, डॉ. एन. एस. मासाळ, पी. एल. भादवणकर, टी. एम. पाटील आदी उपस्थित होते.

Students

College

Rally